BJP Oppose to Anna Bansode : राष्ट्रवादीचा प्रचार नाही करणार, अण्णा बनसोडेंना भाजपचा विरोध
Continues below advertisement
BJP Oppose to Anna Bansode : राष्ट्रवादीचा प्रचार नाही करणार, अण्णा बनसोडेंना भाजपचा विरोध
पिंपरी विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार करायचा नाही. असा ठराव करत भाजपने थेट आमदार अण्णा बनसोडेंना विरोध दर्शवला आहे. लोकसभेत कमळाचा उमेदवार मिळाला नाही आता आम्हाला कमळाचाचं उमेदवार हवा अशी आग्रही भूमिका बैठकीत एकमुखाने मांडण्यात आली. भाजपचे विधान परिषदेचे आमदार उमा खापरे आणि अमित गोरखेंसह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादी विरोधी सूर उमटला. लोकसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीचा प्रचार केला नाही मग आपण घडाळ्याचा प्रचार का करायचा? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. ठरल्याप्रमाणे ही मागणी महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकीपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंकडे केली जाणार आहे.
Continues below advertisement