मुंबई : भोसरी जमीन खरेदीवरुन एकनाथ खडसेंनी पुन्हा सरकारला धारेवर धरलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भोसरी एमआयडीची जमीन खरेदीवरुन झालेल्या आरोपांचं सत्य काय, ते स्पष्ट करावं, असं म्हणत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा सरकारला खडसावलं आहे. आज विधानसभेत एकनाथ खडसेंनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला.
भोसरी एमआयडीमध्ये जावयाच्या नावावर स्वस्तात जमीन खरेदी करुन पदाचा दुरुपयोग केल्याचा एकनाथ खडसेंवर आरोप आहे. याप्रकरणी एक सदस्यीय झोटिंग समितीही नेमली मात्र त्याचा अहवाल अद्यापही सरकारनं सादर केला नाही. याप्रकरणात यापुर्वीही खडसेंनी आक्रमक भूमिका घेतली होती.