मुंबई : ..तर मी तुरुंगात जायला तयार आहे..! कोर्टाच्या आदेशावर डीएसकेंची प्रतिक्रिया
Continues below advertisement
रिकाम्या हातानं येऊ नका, पैसे उसने घ्या, भीक मागा, काहीही करा, लोकांचे पैसे कधी परत करणार याची माहिती द्या, असे मुंबई हायकोर्टाने डी. एस. कुलकर्णी यांना बजावलं आहे. तसेच, 13 फेब्रुवारीला होणाऱ्या सुनावणीत डीएसकेंना पत्नी हेमांगीसह हायकोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
7 ते 11 फेब्रुवारी दरम्यान सकाळी 11 ते 1 आणि दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत तपास अधिकाऱ्यांपुढे हजर राहण्याचे निर्देश डीएसकेंना देण्यात आलेत आणि डीएसकेंवर MPID अॅक्टखाली काय कारवाई केली जाऊ शकते याचा तपशील सादर करा, असे राज्य सरकारला निर्देश देण्यात आले आहेत.