Drainage Death | धारावीमध्ये नाल्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू | मुंबई | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Jul 2019 08:21 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतल्या दुर्दैवी घटनांची मालिका थांबत नाही आहे. गोरेगांव आणि वरळी उदाहरण ताज असतानाच मुंबईतल्या धारावीत नाल्यात पडून सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. नाल्यात किंवा गटारात पडून मृत्यू झाल्याची गेल्या पाच दिवसातली ही तिसरी घटना आहे.
अमित जैस्वाल असं धारावीत नाल्यात पडून मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. नाल्याजवळ खेकडा पकडायला गेला असताना या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोहोचल्यावर या ठिकाणी कोणतीही संरक्षक भिंत किंवा जाळी नसल्याचं लक्षात आलं. याप्रकरणी स्थानिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करुनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.