Narhari Zirwal : धनगर समाज आदिवासीत येत नाही; सरकारने जबाबदारी स्वीकारावी - नरहरी झिरवाळ

Continues below advertisement

Narhari Zirwal : धनगर समाज आदिवासीत येत नाही; सरकारने जबाबदारी स्वीकारावी - नरहरी झिरवाळ  राज्यात मराठा (Maratha Reservation) आणि ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) आंदोलन सुरु असताना धनगर आरक्षणावरून (Dhangar Reservation) आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याचा शब्द दिला आहे. यानंतर धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर विधानसभा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.   नरहरी झिरवाळ यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून आरक्षण देण्याला आपला स्पष्ट विरोध दर्शविला आहे. राज्य सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमात या प्रवर्गातून आरक्षण देण्याचा शासन अध्यादेश (GR) काढला तर राज्यातील 60 ते 65 आमदार राजीनामा देतील, असा निर्वाणीचा इशाराही नरहरी झिरवाळ यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता.   सोमवारपासून नरहरी झिरवाळ यांचे बेमुदत धरणे आंदोलन यानंतर आता सोमवारपासून मंत्रालयात समोर असलेल्या गांधी पुतळ्याजवळ नरहरी झिरवाळ हे बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत. सरकारने धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण देण्याचा जीआर काढण्याची भूमिका मागे घ्यावी, ही प्रमुख मागणी त्यांनी केली आहे. याच मागणीसाठी नरहरी झिरवाळ यांच्यासह आदिवासी आमदार देखील गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram