Drainage Death | उल्हासनगरमध्ये अनेक ठिकाणी गटारं उघडीच | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Jul 2019 08:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एकीकडे मुंबईत दिव्यांशसारखे चिमुकले गटारात पडून वाहून जात आहेत. मात्र यातून इतर महापालिकांनी शहाणपण घेतलेलं दिसत नाही. उल्हासनगर शहरात पाच कॅम्प असून अनेक ठिकाणी गटारं उघड्यावर पडलेली दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी अशाच गटारात पडून दुचाकीचा अपघात झाला होता, मात्र यातून कोणताही धडा महापालिकेने घेतलेला नाही. शिवाय याबाबत अधिकाऱ्यांनाही विचारलं असता, पाहणी करुन झाकणं लावू, अशी मोघम उत्तरं देण्यात येत आहेत.