माझा विशेष : मुख्यमंत्र्यांवर साम, दाम, दंड, भेद वापरण्याची वेळ का आली?
Continues below advertisement
एकीकडे मित्रपक्ष असलेले सेना भाजप एकमेकांवर गंभीर आरोप करत असताना दुसरीकडे भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप अडचणीत आला आहे. आचारसंहिता सुरु असताना तुडतुड्या किडीची लागण झालेल्या पिकांची नुकसान भरपाई देण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरु होतं. एबीपी माझाने ही बातमी दाखवल्यानंतर अखेर ही मदत थांबवण्यात आली. आता 29 मे नंतर मदत दिली जाणार आहे. हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्य़ांना नुकसान भरपाईची मागणी विरोधकांनी केली होती. त्यावेळी सरकारनं ही मागणी मान्यही केली. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणि ते ही आचारसंहितेच्या काळात सरकारने देऊ केलेल्या मदतीमुळे भाजप इथेही अडचणीत आला आहे
Continues below advertisement