ABP Majha Headlines : 12 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  12 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानपरिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांना फोन करुन दीपक चव्हाण (Deepak Chavan) यांची उमेदवारी जाहीर केली आहे. फलटण हा अनूसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून यापूर्वी तीन टर्ममध्ये दीपक चव्हाण निवडून आले आहेत.  रामराजे नाईक निंबाळकर यांची   सोळशीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून फलटण विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा केली. 

साताऱ्यातील फलटण विधानसभा मतदारसंघातील उत्तर कोरेगाव तालुक्यातील सोळशी ग्रामपंचायतीच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना उपस्थित राहता आले नाही. मात्र, त्यांनी सभेतील नागरिकांसोबत फोनवरून संवाद साधत आगामी फलटण विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांची पुन्हा एकदा उमेदवारीची घोषणा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला नव्हता. निंबाळकर कुटुंबानं उघडपणे धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार केला होता. रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्ष वाढलेला आहे. यापार्श्वभूमीवर  रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भाषणादरम्यान थेट अजित दादा पवार यांनी फोन द्वारे दिपक चव्हाण यांची उमेदवार म्हणून घोषणा केल्याने सर्वच जण अचंबित झाले आहेत. अजित पवार यांनी दीपक चव्हाण यांच्या नावाची घोषणा करताच रामराजे नाईक निंबाळकर यांच्या चेहऱ्यावर देखील हास्य उमटलं. अजित पवारंनी दीपक चव्हाण यांच्या नावाची घोषणा करुन लोकसभेला जे घडलं ते होऊ नये याची काळजी घेतल्याचं चित्र पाहायला मिळाला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram