एक्स्प्लोर
VIDEO | आघाडी होतानाच झोंबाझोंबी सुरु? | माझा विशेष | एबीपी माझा
लोकसभा निवडणुकांचं काऊंटडाऊन सुरु झालंय. निवडणुका म्हटल्या की हेवेदावे, नाराजी आलीच. त्यावरच सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. मात्र सध्या राज्यातलं राजकीय वातावरण तापलंय, ते विखे पुत्राच्या भाजप प्रवेशाने.. सुजय विखे पाटील नगरमधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवायला इच्छुक होते.. मात्र ३ वेळा पराभव होऊनही राष्ट्रवादी ही जागा काही काँग्रेसला सोडायला तयार नाही. त्यामुळे सुजय विखेंनी भाजपत प्रवेश केला. मात्र त्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अडचणी वाढवण्यासाठी त्यांच्याच पक्षातले बाळासाहेब थोरात सरसावले. त्यात बालहट्टवालं विधान करत पवारांनी विखेंच्या जखमेवर मीठ चोळलं. दोघांच्याही पहिल्या याद्या जाहीर झाल्या तरीही काही जागांवर अजूनही चर्चा सुरुच असल्याचंही सांगण्यात आलं. माढा, मावळ, नगरचे उमेदवार अजूनही जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे वातावरण आणखीन ढवळलंय. एकीकडे एकमेकांवर टोकाची टीका करणाऱ्या सेना-भाजपच्या संयुक्त प्रचारसभाही ठरल्या तर आघाडीत अजूनही डळमळीत स्थिती का पाहायला मिळतेय.
राजकारण
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
आणखी पाहा
















