लोणावळा : पर्यटकांच्या सुरक्षेसाठी भुशी डॅम शनिवार-रविवार 5 नंतर बंद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Jul 2018 11:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
विकेंडला भूशी डॅमला जाणाऱ्या पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. शनिवार आणि रविवारी भुशी धरणाकडे जाणारा मार्ग संध्याकाळी ५ नंतर बंद करण्यात येणार आहे. तसा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतल्याची माहिती लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी दिलीय. भुशी धरण आणि लायन्स पॉईंट या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. विकेंडला या मार्गावर पाच ते सहा किलोमीटरच्या रांगा लागतात. त्यामुळे मोठी वाहतूककोंडी होते. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
भुशी धरणाबरोबरच भाजे केव्ह्ज, लोहगड, गिधाड तलाव ही पर्यटनस्थळही संध्याकाळी सहा नंतर बंद करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर हुल्लडबाजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलिसही तैनात करण्यात येणार आहेत.