Fake Medicines : राज्यभरात बनावट औषधांची विक्री, अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत बाब उघड
abp majha web team
Updated at:
17 Dec 2021 11:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यभरात बहुतांश ठिकाणी बनावट जीवनावश्यक (fake medicines selling) औषधांची विक्री (Food and drug administration) होत आहे. अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत ही बाब उघड झाली आहे. यात राज्याप्रमाणेच परराज्यातूनही बनावट औषधे विक्रीस येत असून, ही औषधे खरेदी करताना सावधानता बाळगण्याचे आवाहन (precautions appeal) औषध विभागातर्फे करण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासन, मुंबई येथील गुप्तवार्ता विभाग आणि मे. इंटास फार्मास्युटिकल या उत्पादकांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने गोब्युसेल इंजेक्शन बॅच क्र. 97160072, एम/एस इंटस फार्मास्युटिकल, अहमदाबाद या औषधासारखे बनावट औषध देशातील काही राज्यांमध्ये विक्री होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती.