Deltacron : डेल्टाक्रॉनमुळं कोरोनाची लाट येणार? कोरोनाच्या नव्या रुपाने जगाचं टेन्शन वाढलं
कोरोना रुग्ण संख्या कमी होत असताना चिंता वाढवणारी बातमी समोर आलीय. कोरोनाच्या नव्या रुपाने जगाचं टेन्शन वाढवलंय. डेल्टा आणि ओमायक्रानचा मिळून डेल्टाक्रॉन हा नवा व्हेरियंट समोर आल्याचं सांगत जागतिक आरोग्य संघटनेनं इशारा दिलाय. डेन्मार्क, फ्रान्स, नेदरलँड, ब्रिटनमध्ये या नव्या व्हेरियंटच्या रुग्णांची नोंद झालीय. अमेरिकेतही या नवीन व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळल्याची माहिती समोर येतेय. भारतात बहुतांश राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी झालीय. मात्र नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. दुसरीकडे चीनमध्येही कोरोना परतलाय. एका दिवसात चीनमध्ये 5 हजार 280 नवीन रुग्णांची नोंद झालीय. कोरोना महामारी सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच चीनमध्ये सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या समोर आलीय. तिकडे दक्षिण कोरियामध्येही कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट झाल्याचं पाहायला मिळतंय. दक्षिण कोरियात 12 मार्चला 3 लाख 83 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झालीय. दक्षिण कोरियात राष्ट्रपती निवडणूका होणार आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात सभांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे दक्षिण कोरियात कोरोनाचा कहर वाढत असल्याचे बोललं जातंय.