Chief Justice Of India | मराठमोळे शरद बोबडे नवे सरन्यायाधीश, 18 नोव्हेंबरला शपथ घेणार | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Oct 2019 02:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई 17 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर आता मराठमोळे न्यायाधीश शरद बोबडे यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती होणार आहे. स्वतः रंजन गोगोई यांनी केंद्र सरकारला नवे सरन्यायाधीश म्हणून एस. ए. बोबडे यांचं नाव सुचवलं आहे. त्यानंतर आता त्यास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी मिळाली आहे. 18 नोव्हेंबर रोजी बोबडे सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत.