Mumbai Drugs Case :नेमकं काय झालं शाहरुख आणि आर्यन खान यांच्या भेटीत? पाहा ABP माझाचा स्पेशल रिपोर्ट

Continues below advertisement

क्रूझ पार्टी प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा अर्ज काल सत्र न्यायालयाकडून फेटाळला गेला. एनसीबीनं अटक केल्यापासून आर्यन खानला आपल्या कुटुंबियांचा चेहरा पाहता आला नव्हता. मात्र आज स्वतः शाहरुख खाननं आर्थर रोड कारागृह गाठत मुलगा आर्यनची भेट घेतली. यावेळी दोघेही भावूक झाल्याची माहिती मिळाली आहे. आर्यनला भेटल्यानंतर शाहरुखनं त्याला काही खाल्लस का? असं विचारलं. आर्यननं 'नाही' असं उत्तर देताच शाहरुखनं कारागृह अधिकाऱ्यांना आम्ही आर्यनला काही खाण्यासाठी देऊ शकतो का अशी विचारणा केली. मात्र अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या नियमांकडे बोट दाखवलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram