ABP News

Mumbai Drugs Case : ड्रग्ज प्रकरणात अखेर दोन तासांनंतर अभिनेत्री अनन्या पांडेची NCB चौकशी संपली

Continues below advertisement

ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या जेलमध्ये आहे. याच प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणात आता अभिनेता चंकी पांडेची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबीच्या रडारवर आहे. अनन्या पांडेची एनसीबी कार्यालयात आज दोन तास चौकशी झाली आहे आणि उद्या पुन्हा तिची चौकशी होणार असल्याची बातमी आहे. त्याआधी सकाळी अनन्या पांडे हिच्या घरी एनसीबीने छापे टाकले तसेचं त्यानंतर तिला चौकशीसाठी समन्स बजावला. दुपारी 4 वाजता अन्यना पांडे एनसीबी कार्यालयात दाखल झाली, यावेळी तिच्यासमवेत वडील चंकी पांडेही उपस्थित होते. एनसीबीचा हा तपास आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित असू शकतो. अनन्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची मैत्रीण आहे. एनसीबीने बुधवारी आर्यन खान आणि एका बॉलिवूड अभिनेत्रीचे ड्रग्ज चॅट कोर्टात सादर केले होते आणि त्यामध्ये ड्रग्जबद्दल चर्चा झाली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram