Urmila Matondkar on Shah Rukh Khan Dua : उर्मिला मातोंडकर यांनी शाहरुखला ट्रोल करणाऱ्यांना सुनावलंय
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (lata mangeshkar) यांना अखेरचा निरोप देताना बॉलीवूडचा किंग शाहरुख खानने (shahrukh khan) केलेल्या एका कृतीवरून सर्वत्र चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला शाहरुख खानचा फोटो व व्हिडिओ चांगलाच ट्रोल होताना दिसतोय. यावरच आता विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेत्री व शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
टीकाकारांनी काळ आणि वेळेचं भान जपायला हवं.
लता दिदींच्या पार्थिवावर शाहरूख थुंकला नाही, तर त्यानं दुआ फुंकली. असे वक्तव्य करत उर्मिला मातोंडकर यांनी संताप व्यक्त केला आहे. ट्रोल करणाऱ्यांना उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या भाषेत उत्तर दिलंय. समाज म्हणून आपण कुठे चाललोय? टीकाकारांनी काळ आणि वेळेचं भान जपायला हवं. अशा कडक शब्दात उर्मिला यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लतादीदींच्या निधनाने अवघा देश हळहळला. लतादिदी सदैव स्मरणात राहतील असे उर्मिला यांनी सांगितले