the kashmir files : 'द काश्मीर फाईल्स' चे दिग्दर्शक अग्निहोत्री यांना सीआरपीएफची Y- दर्जाची सुरक्षा
Continues below advertisement
सध्या चर्चेत असलेल्या कश्मीर फाईल्स चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना सीआरपीएफची वाय श्रेणीची सुरक्षा व्यवस्था देण्यात आल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिलीय. देशभरात त्यांना सीआरपीएफची वाय श्रेणी सुरक्षा पुरवण्यात येईल, असं सूत्रांनी सांगितलंय. काश्मिरी पंडितांच्या व्यथावेदनांवर आधारित द कश्मीर फाईल्स चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर विवेक अग्रिहोत्री चर्चेत आहेत. या चित्रपटावरून उलटसुलट प्रतिक्रियाही येत आहेत. विवेक अग्निहोत्री यांना काही धमक्याही आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर त्यांना सीआरपीएफची वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय......
Continues below advertisement