Madhur Bhandarkar on Nitin Desai : अजुनही विश्वास बसत नाही... मधूर भांडारकर भावूक, आठवणींना उजाळा
Madhur Bhandarkar on Ntin Desai: अजुनही विश्वास बसत नाही... मधूर भांडारकर भावूक, आठवणींना दिला उजाळा
Nitin Desai : प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये (ND Studio) गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. त्यांनी जीवन यात्रा संपवल्यामुळे मराठी हिंदी मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अद्याप त्यांच्या आत्महत्येचं कारण समोर आलेलं नाही. 'देवदास','लगान' अशा अनेक सुपरहिट सिनेमांचं कला दिग्दर्शन नितीन देसाई यांनी केली आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
एखाद्या कलाकाराची इच्छा असते की त्याची कला सादर करताना कलेसोबतच त्याचा मृत्यू व्हावा. नितीन देसाई यांचा अंतदेखील असाच झाला आहे. आता समोर आलेल्या माहितीनुसार, एनडी स्टुडिओमधील एका मोठ्या रंगमंचाच्या मध्यभागी नितीन देसाई यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. एनडी स्टुडिओमध्ये एक मोठा रंगमंच आहे. ज्याला बिग फ्लोर असे नाव आहे. या रंगमंचावर त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली तसेच तिथेच ते दोरीला अटकलेले आढळले, असे स्थानिकांनी सांगितले आहे. त्यामुळे ज्या रंगमंचावर देसाई यांनी जगाचा सेट उभारला त्याच रंगमंचावर त्यांचा अंत होणं हे दुर्दैवी आहे.