Sushant Singh Rajput case | संजय लीला भन्साळी यांच्या चौकशीतून काय माहिती मिळाली?
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणांमध्ये पोलिसांचा तपास दिवसेंदिवस अधिक सखोल होत चालला आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे संजय लीला भन्साळी यांची सोमवारी (6 जुलै) वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करण्यात आली. संजय लीला भन्साळी सकाळी 11.30 च्या सुमारास वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये आपल्या बॉडीगार्ड आणि लीगल टीमसोबत आले आणि दुपारी 3.30 च्या सुमारास ते वांद्रे पोलीस स्टेशनमधून निघाले. तीन तास चौकशी केल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. यानंतर वांद्रे संजय लीला भन्साळी सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्येही गेले होते. इथे डीसीपी अभिषेक त्रिमुखे आणि त्यांच्या टीमने भन्साळी यांची स्वतंत्र एक तास चौकशी केली. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान सजंय लीला भन्साळी यांना एकूण 30 ते 35 प्रश्न विचारण्यात आले.
























