एक्स्प्लोर
Actor Rajinikanth Dissolves Party : राजकारणात येण्याचा विचार नाही : रजनीकांत
सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात येणार नसल्याचं जाहीर करत त्यांची रजनी मक्कल मंदरम ही संघटना बरखास्त केलीय. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अफाट लोकप्रिय असलेले रजनीकांत तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेली काही वर्षे सुरु होती. त्यासाठी एकएक पाऊल टाकत त्यांनी रजनी मक्कल मंदरम या संघटनेची स्थापनाही केली होती. रजनीकांत भाजपशी जुळवून घेत राजकारण करणार का अशीही चर्चा होती. पण डिसेंबरमध्ये यू टर्न घेऊन विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आणि आज त्यांनी रजनी मक्कल मंदरम ही संघटना गुंडाळण्याची घोषणा करून राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























