एक्स्प्लोर
महाविद्यालयाचे नामफलक मराठीत हवे, Yuva Sena ची विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी
मुंबई विद्यापीठ आणि त्याअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांचे नामफलक मराठीत करा, अशी मागणी युवासेनंनं विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे. एकीकडे महाविद्यालयात मराठीची गळचेपी होतेय आणि दुसरीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत केंद्र सरकारकडून चालढकल सुरु आहे. यात अडकून पडलेल्या मायमराठीचं संवर्धन, प्रचार आणि प्रसार होण्यासाठी युवासेनेनं या मागण्या केल्या आहेत. विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेमध्ये युवासेनेनं स्थगन प्रस्ताव मांडून या मागण्या केल्या आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र

















