एक्स्प्लोर
तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला शिक्षा होईपर्यंत रोज आंदोलनं करणार, गावकऱ्यांची भूमिका
कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील सावे गावात अतिशय संताप आणणारी घटना घडलीय. एका तीन वर्षांच्या बालिकेवर 55 वर्षीय नराधमानं लैंगिक अत्याचार केले, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आई-वडील आणि आजोबा शेतात गेले असताना बालिका दारात खेळत बसली होती, त्यावेळी तिला आरोपी यशवंत नलवडे याने घरामध्ये बोलवून अत्याचार केले. चिमुकलीची प्रकृती बिघडल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. आता गावकऱ्यांनी संबधित आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केलीय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























