एक्स्प्लोर

Mumbai Local : मोबाईल चोराचा पाठलाग आला जीवाशी, महिला ट्रॅकवर पडल्याने गंभीर जखमी

मुंबई :  लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांचा जीव सुरक्षित नसल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. कळवा स्टेशनवरील मोबाईल चोरामुळे जीव गेल्याची घटना आपण पाहिली होती. अगदी तसाच प्रकार पश्चिम रेल्वेच्या दादर स्टेशनवर घडला आहे. यात मोबाईल चोराचा पाठलाग करणाऱ्या एका पश्चिम रेल्वेच्या महिला कर्मचाऱ्याचा जीव जाता जाता वाचलाय. त्यानंतर सीसीटिव्ही आधारे रेल्वे पोलिसांनी देखील चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

दादर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 4 वर काल दुपारी ही घटना घडलेली आहे. विरारवरून सुटलेली लोकल संध्याकाळी पावणे पाचच्या दरम्यान दादर स्थानकात आली. याच लोकलमध्ये स्नेहल हूलके नावाची महिला प्रवास करत होते. स्नेहल हल्लीच पश्चिम रेल्वेमध्ये ज्युनियर इंजीनियर या पदावर रुजू झाली. तिला साडेपाच वाजता आपल्या कामावर पोहचायचे होते. पण तिच्या नकळत मागून येऊन एका व्यक्तीने तिच्या हातातला मोबाईल घेतला आणि धावत्या ट्रेनमधून तो खाली उतरला. मोबाइल गेल्याचे लक्षात येताच स्नेहल देखील त्याच्या मागे धावली मात्र तिने पाय बाहेर टाकताच प्लॅटफॉर्म संपल्याने ती थेट रुळांवर पडली. तिचे सुदैव म्हणावे लागेल म्हणून ती लोकलच्या चाकाखाली आली नाही. मात्र या घटनेत तिला गंभीर दुखापत झाली आहे.

ही पूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी ही घटना लक्षात येताच त्यांनी स्नेहलला पश्चिम रेल्वेच्या जग जीवन राम रुग्णालयात दाखल केले. पण ताबडतोब आरोपीचा शोध सुरू केला. सीसीटीव्हीच्या सहाय्याने 2 तपास पथकांनी 3 तासात राहुल बुटिया या आरोपीला अटक केली. राहुल हा 25 वर्षांचा असून तो कपड्यांच्या बदल्यात भांडी विकण्याचे काम करतो. या आधी त्याने कधीच गुन्हा केला नसल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पण त्यादिवशी त्याने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून 17 हजारांचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. 

क्राईम व्हिडीओ

Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
Mira Bhayandar Crime News: मध्यरात्री शिकारीसाठी जंगलात शिरले; काहीच सापडलं नाही, परताताना डोळे चमकले अन्..., गोळीबारात ग्रुपमधील एकाचा मृत्यू, मृतदेहावर पहाटेच उरकले अंत्यसंस्कार
मध्यरात्री शिकारीसाठी जंगलात शिरले; काहीच सापडलं नाही, परताताना डोळे चमकले अन्..., गोळीबारात ग्रुपमधील एकाचा मृत्यू, मृतदेहावर पहाटेच उरकले अंत्यसंस्कार
Bhandara Food Poisoning : दुर्गोत्सवाच्या जेवणातून 300 लोकांना विषबाधा; भंडाऱ्याच्या खराशी गावातील खळबळजनक प्रकार
दुर्गोत्सवाच्या जेवणातून 300 लोकांना विषबाधा; भंडाऱ्याच्या खराशी गावातील खळबळजनक प्रकार
Jitendra Awhad Pune Crime : सिक्युरिटी सुपरवायझर; पुण्यात भाड्याच्या घरात वास्तव्य, जितेंद्र आव्हाडांना मारण्याची धमकी, मालकानं टीव्ही पाहिल्यानंतर पोलिस ठाण्यात नेलं अन्...
सिक्युरिटी सुपरवायझर; पुण्यात भाड्याच्या घरात वास्तव्य, जितेंद्र आव्हाडांना मारण्याची धमकी, मालकानं टीव्ही पाहिल्यानंतर पोलिस ठाण्यात नेलं अन्...

व्हिडीओ

Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, तब्बल 56 वर्षानंतर ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, नेमकं काय घडलं?
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
South Star Yash On Sai Pallavi In Ramayana: 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
Supriya Sule : पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून भाजप उमेदवारांना मतदान करण्यासाठी फोन, ऑडिओ क्लिप शेअर करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी
भाजप उमेदवारांना मतदान करा, पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून मतदारांना फोन, सुप्रिया सुळेंकडून ऑडिओ क्लिप शेअर
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
Embed widget