एक्स्प्लोर
Kalyan Traffic Police : चेकिंगसाठी थांबवलं म्हणून तरुणाचा दगडाने वाहतूक पोलिसांवर हल्ला, पोलिस जखमी
कल्याणमध्ये एका दुचाकीस्वारानं पोलिसाला दगडानं मारहाण केल्याची घटना घडलीय. याप्रकरणी राहुल रोकडे या दुचाकीस्वाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कल्याण पश्चिमेकडील शहाड पुलाजवळ पोलिसांची नाकाबंदी सुरु असताना वाहतूक पोलीस प्रकाश पटाईत या ठिकाणी कर्तव्य बजावत होते. यावेळी दुचाकीवरुन भरधाव वेगात येणाऱ्या राहुल कोकडे या तरुणाला पोलिसांनी थांबवलं. मात्र यावेळी या दुचाकीस्वारानं पोलिसांशी हुज्जत घालत त्यांना दगडाने मारहाण केली. या घटनेत वाहतूक पोलीस प्रकाश पटाईत जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग























