VIDEO | शहीद निनाद मांडवगणे यांच्या पत्नी विजेता आणि आई सुषमा यांच्याशी बातचीत | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Mar 2019 12:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App14 फेब्रुवारीला पुलवामा हल्यात महाराष्ट्राचे दोन वीर शहीद झाले तर 27 फेब्रुवारीला काश्मिरच्या बडगाममधल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत स्कॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांना वीरमरण आलं. निनाद यांच्या जाण्यानं अवघा महराष्ट्र हळहळला. शहीद निनाद मांडवगणे यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी विजेता, त्यांची मुलगी, आई-वडिल आणि भाऊ असा परिवार आहे. निनाद यांना लहानपणापासून देशसेवेची आवड होती. या परिवाराचं दुःख आपल्या कल्पनेपलिकडचं आहे. पण निनाद यांनी बजावलेल्या देशसेवेचा त्यांना सार्थ अभिमान आहे. निनाद यांच्या पत्नी विजेता आणि त्यांच्या मातोश्री सुषमा मांडवगणे यांच्याशी केलेली ही बातचीत.