PM Modi Wardha Daura : पीएम विश्वकर्मी योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, मोदींच्या वर्धा दौऱ्यात काय?
PM Modo Wardha Daura : पीएम विश्वकर्मी योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, मोदींच्या वर्धा दौऱ्यात काय?
वर्ध्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पी एम विश्वकर्मा योजनेचा वर्षांपूर्ती सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यात राज्यपाल,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असणार आहे. सकाळी 11 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. कारागिरांच्या चित्र प्रदर्शनीचे देखील येथे आयोजन करण्यात आले आहेय. याचवेळी अमरावती येथील पी एम मित्रा पार्कचे ई भूमिपूजन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा शुभारंभ होणार आहे. वर्ध्याच्या स्वावलंबी मैदानावर कार्यक्रम आयोजन केलाय. पी एम विश्वकर्मा योजनेच्या 18 लाभार्थ्यांना दिली जाणार योजनेचा प्रातिनिधिक स्वरूपात लाभ दिला जाणार आहे. कार्यक्रम स्थळवरून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी.