नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस देशात सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले मुख्यमंत्री
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
देवेंद्र फडणवीस हे देशात सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले मुख्यमंत्री ठरले आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर तब्बल 22 गुन्हे दाखल असून त्यापैकी तीन गंभीर स्वरुपाचे आहेत. देशातील 29 राज्यांचे मुख्यमंत्री आणि दोन केंद्रशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार 'असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स' (एडीआर) या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती आहे.