चाळीसगाव : कारवाई टाळण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यावर कंटेनर घातला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
वेगानं जाणाऱ्या कंटेनरला थांबवणं एका पोलीस कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतलं. चाळीसगाव जवळील औरंगाबाद रोडवर कर्माचारी हवालदार अनिल शिसोदे गस्त घालत होते. त्यावेळी वाहनांची तपासणी करताना समोरून येणाऱ्या कंटेनरला थांबवण्याचा शिसोदे यांनी प्रयत्न केला. याचवेळी कंटेनर चालकानं पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी पळ काढला. आणि याच प्रयत्नात कंटेनर थेट शिसोदे यांच्या अंगावर गेला. आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंरही कंटेनरचालक पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. ही घटना सकाळी १० च्या सुमारास घडली.