VIDEO | शिवजयंतीनिमित्त महिला शाहीर विनता जोशींचं खास सादरीकरण | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Feb 2019 12:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महाराजांची थोरवी सांगावी तितकी थोडी. अनेक शाहिरांनी महाराजांचा गुणगौरव आपल्या शाहिरीतून केलाय. आणि आज महाराष्ट्राच्या दैवताला वंदन करण्य़ासाठी आपल्यासोबत आहेत महिला शाहीर विनता जोशी. त्यांची विशेष ओळख म्हणजे त्या वीर सावरकरांचे धाकटे बंधू डॉ नारायणराव सावरकरांची नात आहेत. आणि किल्ले रायगडावरील "शाहीरी रात्र" कार्यक्रमात आमंत्रित केलेल्या एकमेव महिला शाहीर आहे. आज त्या आणि त्यांच्या काही सहकारी पोवाड्यातून आणि शाहिरीतून महाराजांना वंदन करणार आहेत. ३५ वर्षांपासून त्या शाहिरीचे कार्यक्रम सादर करतात. देशात व परदेशात मिळून त्यांनी आजवर ९९४ कार्यक्रमांचं सादरीकरण केलं आहे. आज महाराजांच्या जयंती दिनी महिला शाहीर विनता जोशींच्या साथीनं महाराजांना मानवंदना देऊया.