सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या Top 70 at 7AM 20 Sept 2024

सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या Top 70 at 7AM 20 Sept 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौैऱ्यावर... मोदींच्य हस्ते आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन...तर विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांना संबोधणार

महाविकास आघाडीची आज जागावाटपाची बैठक, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा १५ चे २० जागांवर तिढा, तोडगा काढण्यासाठी मविआ कोणता फॉर्म्युला वापरणार याची उत्सुकता

भाजपा १६०जागांसाठी आग्रही राहणार, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून १२६ ते १२८ जागांसाठी तयारी, अजितदादांची ७० जागांसाठी डिमान्ड

बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना अजितदादांची जाहीर तंबी... मर्यादा पाळण्याचा सल्ला, नाव न घेतला संजय गायकवाड आणि अनिल बोंडेंवर निशाणा...
((गायकवाड यांचं नाव न घेता टोचले कान))

अजितदादांनी कुठेही तक्रार करावी, मुस्लिमद्वेषी वक्तव्याविरोधात भाजप हायकमांडकडे तक्रार करणाऱ्या अजितदादांना नितेश राणेंचं आव्हान, तर फडणवीसांकडून नितेश यांची पाठराखण...

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola