ब्रेकफास्ट न्यूज : आजपासून फुटबॉल विश्वचषकाचा थरार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अवघं जग आजपासून सलग तेहतीस दिवस एकाच रंगात न्हाऊन निघणार आहे आणि तो रंग आहे फुटबॉलचा. निमित्त आहे फिफा विश्वचषकाचं. रशियात आयोजित एकविसाव्या फिफा विश्वचषकाला आजपासून सुरुवात होत आहे. फुटबॉलचा हा विश्वचषक म्हणजे दर चार वर्षांनी येणारी खेळांच्या दुनियेची जणू दिवाळी. मॉस्कोतल्या ल्युझिनिकी स्टेडियमवर होणाऱ्या एका दिमाखदार सोहळ्यात या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात येईल आणि त्यानंतर यजमान रशिया आणि सौदी अरेबिया संघांमधल्या सामन्याने विश्वचषकाची नांदी होईल. विश्वचषकाचा हा सण तब्बल 33 दिवस चालणार असून, या कालावधीत 32 संघ आणि त्यांच्या 64 सामन्यांमध्ये मिळून सर्वोत्तम दर्जाचा फुटबॉल पाहायला मिळेल.