एक्स्प्लोर
VIDEO | जाहिरात विश्वात भरारी घेणाऱ्या सायली कुलकर्णीशी खास गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
काही दिवसांपूर्वी गाजलेली रस्ता सुरक्षेसंदर्भातली जाहिरात तुम्हाला नक्कीच आठवत असेल. ज्यात वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या चालकांना अक्षय कुमार क्या ये रोड तुम्हारे बार की है? असं खडसावून विचारतो. ही जाहिरात खूपच प्रभावी ठरली आणि हीटपण झाली. या जाहिराती मागे असलेल्या चेहऱ्यांमधला एक प्रमुख चेहरा आहे सायली कुलकर्णीचा. सध्या रस्ते सुरक्षा सप्ताह सुरु आहे आणि सायलीचा निर्मिती सहभाग असलेल्या रस्ते सुरक्षा विषयक जाहिरातीला 'बेस्ट अॅडवर्टाइझिंग कॅम्पेन २०१८’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. विशेष बाब म्हणजे अवघ्या पंचवीस वर्षांच्या सायली कुलकर्णी या मराठमोळ्या तरूणीने या जाहिरातीची संकल्पना साकारली आहे. या यशाबद्दल सायलीचं सध्या जाहिरातविश्वात खूप कौतुक होतंय. अॅडव्हर्टाझिंग या विषयात पदवी मिळवल्यावर सायलीनं या क्षेत्रात पाऊल ठेवलं.
ट्रेडिंग न्यूज
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला? Special Report
Pune Christian Conversion : पुण्यात पर्यटक म्हणून आले... धर्मप्रचाराला लागले Special Report
Bacchu Kadu Vidhan Parishad Election : बच्चू कडूंना परिषदेची उमेदवारी मिळणार? Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
भारत
भारत
















