ब्रेकफास्ट न्यूज : बँक ऑफ महाराष्ट्रचे संचालक रवींद्र मराठे यांना पदावरुन हटवलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
डीएसके यांना दिलेल्या कर्ज प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र मराठे आणि कार्यकारी अध्यक्ष आर. के. गुप्ता यांना पदावरुन हटवण्यात आलं आहे. बँकेच्या संचालक मंडळाने घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. त्यामुळे हे दोघेही यापुढे बँकेत कार्यरत असले तरी त्यांच्याकडे कुठल्याही स्वरुपाचे अधिकार असणार नाहीत, असं मुंबई शेअर बाजाराला कळवण्यात आलं आहे. मराठे यांच्या जागी एस. सी. रावत यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नेमणूक करण्यात आली.