भिवंडी : फ्रिजचा स्फोट, आगीत किचन जळून खाक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Jan 2018 12:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भिवंडी शहरात शॉर्ट सर्किटमुळे फ्रिजमध्ये स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. स्फोट इतका भीषण होता, की या स्फोटात संपूर्ण किचन जळून खाक झालं, तर फ्रिजचे तुकडे उडाले.भिवंडी शहरातील निजामपुरा परिसरात फ्रिजमध्ये स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. या इमारतीत राहणाऱ्या 25 ते 30 रहिवाशांना सुरक्षितपणे इमारतीबाहेर काढण्यात आलं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.