मराठा मोर्चा : औरंगाबादमध्ये आणखी दोन मराठा आंदोलकांचा आत्महत्येचा प्रयत्न
Continues below advertisement
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अजून दोन आंदोलकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी इथं 60 वर्षीय जगन्नाथ सोनवणे यांनी विष प्राशन केलंय. सध्या त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय. दुसऱ्या घटनेत याच गावात एका तरुणानं पुलावरुन कोरड्या नदीपात्रात उडी मारली. गुड्डू सोनावणे असं या तरुणाचं नाव आहे. सुरुवातीला त्याला देवगाव रंगारीच्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आलं, नंतर मात्र त्याला घाटी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
Continues below advertisement