712 : मुंबई : राज्यात रोज 40 लाख लिटर अतिरिक्त दूध
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दुग्ध व्यवसायातील प्रश्न काही कमी होताना दिसत नाहीयेत. सुरुवातीला योग्य दरासाठी दुग्ध व्यवसायिकांना लढा द्यावा लागला आणि आता अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर झालाय. गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून राज्यात हा प्रश्न भेडसावतोय. रोज ४० लाख लिटर दूध अतिरिक्त राहत आहे. साधारणपणे उरलेल्या दुधाची पावडर तयार केली जाते. मात्र देशात २ लाख टन दूध पावडर तशीच पडलेली आहे. राज्यात हा आकडा ३० हजार टनांवर जातो. मागणीपेक्षा पुरवठा जास्त असल्यानं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये दर घसरलेत. या परिस्थितीमुळे दूध संघांपुढे मोठा प्रश्न निर्माण झालाय. तयार दूध पावडर गोडाऊनमध्ये पडून राहिल्यानं, कोट्यावधींचं आर्थिक नुकसानही सहन करावं लागणार आहे.