एक्स्प्लोर

राष्ट्रपती राजवटीत म्हाडाचे गृहप्रकल्प सुरुच राहणार

राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने प्रकल्प लटकतील, अशी चर्चा बीडीडी चाळ तसंच मोतीलाल नगराच्या रहिवाशांमध्ये होती. या चर्चेने अनेक रहिवाशांनी शंका निरसन करण्यासाठी थेट म्हाडा कार्यालयात धाव घेतली.

मुंबई : महाराष्ट्रात लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटीचा म्हाडाच्या कोणत्याच प्रकल्पाला अडथळा येणार नसल्याने हे सर्व प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील, असा विश्वास म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. म्हाडाकडून गोरेगावमधील मोतीलालनगर, बीडीडी चाळ पुनर्विकासासह इतर प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने प्रकल्प लटकतील, अशी चर्चा बीडीडी चाळ तसंच मोतीलाल नगराच्या रहिवाशांमध्ये होती. या चर्चेने अनेक रहिवाशांनी शंका निरसन करण्यासाठी थेट म्हाडा कार्यालयात धाव घेतली. सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही सुटला नसल्याने राज्यातील या घडामोडींचा दृश्य, अदृश्य परिणाम प्रकल्पांवर होणार का, याची गृहनिर्माण क्षेत्रात जोरदार चर्चा सुरु झाली. मात्र, म्हाडा प्राधिकरणाच्या मान्यता मिळालेल्या आणि मार्गी लागलेल्या प्रकल्पांच्या पूर्ततेत कोणतीही बाधा उद्भवणार नसल्याचं म्हाडातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. म्हाडाकडून गोरेगावमधील मोतीलालनगर, बीडीडी चाळ पुनर्विकासासह इतर प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा तर फडणवीस सरकारच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात होता. त्यामुळे आता हे सरकार नसल्याने या सर्वच प्रकल्पांच्या पूर्ततेत काही अडचणी येतील का, हा प्रश्न या प्रकल्पांशी संबंधित रहिवाशांकडून वारंवार उपस्थित केला जात आहे. म्हाडाने प्रकल्पांना दिलेली मान्यता, प्राधिकरण बैठकीत झालेले ठराव, राज्य सरकार स्तरावर झालेली त्यांची नोंद, त्यासंदर्भातील घेण्यात आलेले निर्णय, स्थानिक रहिवाशांची साधलेला संवाद, संमती आदी प्रक्रिया पार पडल्या आहेत. यामुळे म्हाडाकडील मार्गी लागलेल्या कोणत्याही प्रकल्पांमध्ये अडचणी येणार नसल्याची ग्वाही मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी दिली. म्हाडाकडून रितसर मान्यता लाभलेले सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं ज्येष्ठ अधिकाऱ्यांनीही स्पष्ट केलं आहे. या सर्व प्रकल्पांना मान्यता असून, ती प्रक्रिया सातत्याने सुरुच होती. त्यामुळे त्यात पुढचा टप्पा गाठण्यात अडचणी येणार नसल्याचंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange : जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
Lalbaugcha Raja: सोनं,चांदी, डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
सोनं,चांदी,डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange : जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
Lalbaugcha Raja: सोनं,चांदी, डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
सोनं,चांदी,डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
पुढच्या वर्षी लवकर या... कोकणात दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, वाजत गाजत मिरवणूक, चिमुकल्यांसह भक्तगण भावुक
पुढच्या वर्षी लवकर या... कोकणात दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, वाजत गाजत मिरवणूक, चिमुकल्यांसह भक्तगण भावुक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या मागण्या नेमकं काय? मुंबईकडे निघालेल्या पाटलांचे आत्तापर्यंतचे 11 वे उपोषण, नेमकं कुठ अडलय?
मनोज जरांगेंच्या मागण्या नेमकं काय? मुंबईकडे निघालेल्या पाटलांचे आत्तापर्यंतचे 11 वे उपोषण, नेमकं कुठ अडलय?
Eknath Shinde on Manoj Jarange: आमच्यावर टीका करण्याचा अधिकार, पण...; मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
आमच्यावर टीका करण्याचा अधिकार, पण...; मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
Embed widget