एक्स्प्लोर
शायनी, गुत्थी, तृप्ती देसाई... 'बिग बॉस'च्या दहाव्या पर्वात कोण कोण?

1/10

बिग बॉसचं दहावं पर्व 16 ऑक्टोबरपासून 'कलर्स' वाहिनीवर सुरु होत आहे. यामध्ये कोणते कलाकार दिसणार याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.
2/10

बलात्कार प्रकरणात तुरुंगवास भोगलेला आरोपी, अभिनेता शायनी अहुजा यालाही बिग बॉसमध्ये सहभागी होण्यास विचारणा झाल्याचं वृत्त आहे.
3/10

'रोडीज'मुळे चर्चेत आलेली व्हीजे बानी 'बिग बॉस 10' मध्ये दिसण्याची शक्यता आहे.
4/10

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही बिग बॉसच्या आगामी पर्वात सहभागासाठी विचारणा झाल्याचं सांगितलं होतं. मात्र बिग बॉसचा आवाज महिलेचा असेल, तरच या प्रस्तावाबाबत आपण सकारात्मक विचार करु, अशी अट त्यांनी ठेवली होती.
5/10

कपिल शर्माच्या शोमध्ये 'गुत्थी'च्या भूमिकेमुळे घराघरात पोहचलेला अभिनेता सुनिल ग्रोव्हर बिग बॉसच्या घरात हजेरी लावू शकतो.
6/10

कुछ कुछ होता है चित्रपटात झळकलेली चिमुरडी अंजली अर्थात अभिनेत्री सना सईदही बिग बॉसमध्ये दिसू शकते.
7/10

प्रत्युषा बॅनर्जीच्या कथित आत्महत्ये प्रकरणी संशयाची सुई असलेला तिचा बॉयफ्रेण्ड राहुल राज सिंगही सहभागी होण्याची चिन्हं आहेत.
8/10

अभिनेता मयुर वर्मा याने 'बिग बॉस'च्या दहाव्या पर्वात आपण सहभागी होणार असल्याचं मीडियाला सांगितलं आहे. मयुरने जिनी अँड जुजू मालिकेत साकारलेला बनी आणि स्वरांगिनी मालिकेत साकारलेला कार्तिक प्रचंड गाजले आहेत.
9/10

कार्टूनिस्ट आणि लेखक केव्ही गौतम यांनी बिग बॉसच्या नव्या पर्वातील सहभागाला नकार दिला आहे. आपल्या वैचारिक प्रतिमेला या कार्यक्रमामुळे छेद जाईल अशी भीती त्यांना वाटते.
10/10

सुप्रसिद्ध अभिनेते कबीर बेदी यांनीही आपण बिग बॉस 10 मध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. काही मीडिया प्रतिनिधी आपल्या सहभागाच्या वावड्या उठवत आहेत, मात्र त्यात जरासंही तथ्य नाही, असं बेदींनी सांगितलं.
Published at : 20 Sep 2016 05:03 PM (IST)
Tags :
Bigg Boss 10अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
बातम्या
सांगली
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
