Zero Hour : काय आहे नागपूर दक्षिण - पश्चिमचा मूड? फडणवीस सहाव्यांदा सहज विजयी होतील?
Zero Hour : काय आहे नागपूर दक्षिण - पश्चिमचा मूड? फडणवीस सहाव्यांदा सहज विजयी होतील?
हेही वाचा :
ऐन गणेशोत्सवात (Ganeshotsav 2024) एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे (ST Workers Strike) हत्यार उपसले आहे. एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत. आज ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा पहिला दिवस आहे. लातूरमध्ये 396 पैकी 346 फैऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाल्याचे दिसून आले. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या दौऱ्यानिमित्त सहाशे बसेस आरक्षित करण्यात आल्या होत्या. आता बसेसच्या नियोजनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
लातूर विभागात पाच बस आगार आहेत. यात एकूण 564 बसच्या फेऱ्या होत असतात. दररोज किमान 2 हजार 750 च्या फेऱ्या होत असतात. संपूर्ण जिल्ह्यात दररोज 50 लाख रुपयांचा उलाढाल होत असते. मात्र सकाळच्या पहिल्या सत्रात अनेक बस निघाल्या होत्या. त्यानंतर संप सुरू झाला. 396 पैकी 346 फैऱ्या रद्द झाल्या आहेत. 19 हजार 197 किमी अंतरावर बसेस धावल्याच नाहीत. संप किती काळ चालेल याबाबत अनिश्चितता असल्यामुळे राष्ट्रपती दौऱ्यासाठी नियोजित बस सेवेचं काय होईल? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.