Zero Hour Full : एकनाथ शिंदेंनी 15 जागा मिळवत राजकीय प्रतिष्ठा जपली?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour Full : एकनाथ शिंदेंनी 15 जागा मिळवत राजकीय प्रतिष्ठा जपली?
भाजपबरोबर सत्तेत गेल्यावर शिंदेंचे राजकीय अस्तित्व फारसे उरणार नाही असं म्हणणाऱ्यांना बळ मिळाले ते शिवसेनेचे पारंपरिक असे परभणी, अमरावती, धारशिव, रत्नागिरी, पालघर... हे मतदार संघ हातातून गेले तेव्हा. त्यामुळे शिवसेनेचे प्राबल्य असलेले ठाणे, कल्याण, नाशिक, दक्षिण मुंबईसारखे मतदारसंघ आपल्याकडे राखणं... हे एकनाथ शिंदेंसाठी प्रतिष्ठेचं बनलं होतं..
ठाणे तर त्यांचे घर ... त्यांचा गड.. त्याच्याच बाजूला कल्याण-डोंबिवली.. दक्षिण मुंबईत मराठी मतदारांचा गड तर नाशकात शिवसैनिकांचा किल्ला.. त्यामुळे एकनाथ शिंदेंनाही या जागा राखणं खूप महत्वाचं बनलं होतं.. तसं झालं तर विरोधकांना आणि प्रामुख्यानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला प्रचारात आयताच मुद्दा मिळाला असता..वाद होता, रस्सीखेच होती ...हे इथे झालेले दावे-प्रतिदावे, मुंबईवारी, आणि उमेदवार घोषणेला झालेला उशीर.. ह्यावरून स्पष्ट आहे. पण ठाकरेंना तोच फायदा मिळू नये.. महायुती केली म्हणून एकनाथ शिंदेंचा सन्मान राखला गेला ... हाही मेेसेज मतदारांमध्ये आणि खास विरोधकांमध्ये हि जावा... असे अनेक हेतू आज महायुतीनं साध्य केेलेत..जागावाटपानंतर मुख्यमंत्री शिंदेंना विजयाचा विश्वास व्यक्त केलाय