✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour Full : महायुतीत खलबंत ते ठाकरेंची पालिकेसाठी रणनीती; झीरो अवरमध्ये सविस्तर विश्लेषण

विजय साळवी, एबीपी माझा   |  03 Dec 2024 10:02 PM (IST)

मंडळी. आपल्या पहिल्या प्रश्नावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि दिलेला कौल आपण पाहणार आहोतच.. पण, त्याआधी आजच्या महत्वाच्या घडामोडींचं विश्लेषण..


एकनाथ शिंदे...
महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री..
पण, गेल्या तीन दिवसापासून तब्येत ठिक नसल्यानं.. ते माध्यमांपासून दूर राहतायेत.. आजही खरं तर, माध्यमांसह साऱ्या महाराष्ट्राचं ज्यांच्या भूमिकेकडे लक्ष असेल.. ते म्हणजे एकनाथ शिंदे..


महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली.. आणि सत्तास्थापनेत आपला कोणताही अडथळा नसेल.. असं म्हणत त्यांनी राज्यातल्या मुख्यमंत्री निवडीचे अधिकार भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला दिले..


त्यानंतर दिल्लीतली अमित शाहांसोबतची बैठक असो.. तिथून आलेला तो फोटो असो.. त्यावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची झालेली चर्चा असो.. एकीकडे हे सगळं सुरु असतानाच.. शिंदेंचे सहकारी जोरदार बॅटिंग करत होते.. खरं तर, आपला नेता मुख्यमंत्री व्हावा हे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं.. त्यात काही गैरही नाही.. पण, मुख्यमंत्रीपद असो की सत्ता.. सगळा खेळ हा आकड्याचा असतो... आणि या घडीला महाराष्ट्रात याच आकड्यांच्या खेळात भाजपचं पारडं जड आहे.. आणि हे कदाचित शिंदेंनीही मान्य केलंय..
 
पण, सत्तास्थापनेत महत्वाची खाती तरी किमान आपल्याकडे यावीत यासाठी शिंदेंच्या सेनेकडून प्रयत्न सुरु असावेत.. त्याचवेळी शिंदेंच्या सैनिकांनी मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडलेला नाही... कारण, आमच्या नेत्याचा योग्य सन्मान करावा असं म्हणत असतानाच, शिंदेंच्या शिवसैनिकांनी त्यांना मुख्यमंत्रीपद नाही तर गृहमंत्रीपद तरी मिळावं अशी मागणी केली.. त्यांच्या नेत्यांच्याही तोंडी हीच भाषा होती.. 


त्यातच शिंदेंच्या शिवसेनेच उदय सामंत फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचले.. तिथं त्यांच्यापाठोपाठ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही पोहोचले.. जवळपास तासाभराच्या चर्चेनंतर सामंत सागर बंगल्यावरुन निघाले... आणि थेट एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर पोहोचले.. तिथं आमच्या रिपोर्टर्सनी त्यांच्या बोलतं करण्याचा प्रयत्न केला.. पण, सागर बंगल्यासमोर कोणतीही प्रतिक्रिया न देता सामंत निघाले.. आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये ते वर्षा बंगल्यावर पोहोचले.. त्यानंतर संध्याकाळी भेटींना वेग आला.. गिरीष महाजन वर्षा बंगल्यावर पोहोचले.. काही मिनिटांनंतर ते वर्षा बगंल्यावर परतले.. त्यानंतर सात वाजता थेट देवेंद्र फडणवीसांचा ताफा सागर बंगल्यावरुन निघाला.. आणि वर्षा बंगल्यावर पोहोचला.. त्यांचं सोखल विश्लेषण आपण पाहिलंय..  फडणवीसांना भेटण्याआधी उदय सामंतांनी जरा तिखट शब्दात आपल्या पक्षाची बाजू मांडली.. ते नेमकं काय म्हणाले ते आधी पाहूयात..

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour Full : महायुतीत खलबंत ते ठाकरेंची पालिकेसाठी रणनीती; झीरो अवरमध्ये सविस्तर विश्लेषण

TRENDING VIDEOS

Raj Thackeray on Child Kidnaping : राज ठाकरेंनी वेधलं लहान मुलं पळवण्याच्या मुद्याकडे लक्ष, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कारवाईची मागणी1 Hour ago

Sanjay Raut Pc : वंदे मातरमबाबत चर्चेवेळी भाजप, संघाचे बुरखे फाटले, संजय राऊतांचा घणाघात1 Hour ago

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report14 Hour ago

Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report14 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.