Zero Hour Ramakant Achrekar Memorial : आचरेकर सरांच्या स्मारकाचं राज - सचिन यांच्या हस्ते उद्घाटन
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण अमरे यांच्यासह अनेक गुणवान खेळाडूंना घडवणारे महान प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचं आज मुंबईतल्या शिवाजी पार्कात अनावरण करण्यात आलं. आचरेकर सरांच्या ९२व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या स्मारकाचं आज अनावरण करण्यात आलं. आचरेकर सरांचा सर्वोत्तम शिष्य सचिन तेंडुलकरच्या हस्ते या स्मारकाचं अनावरण करण्यात आलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह आचरेकर सरांचे शिष्योत्तम विनोद कांबळी, प्रवीण अमरे, बलविंदरसिंग संधू, पारस म्हांब्रे, समीर दिघे व्यासपीठावर उपस्थित होते. आचरेकर सरांचं शिवाजी पार्कातलं हे स्मारक पाच क्रमांकाच्या प्रवेशद्वारासमोर उभारण्यात आलं आहे. कारण आचरेकर सरांचे शिष्य याच प्रवेशद्वारानं कामत मेमोरियल क्लबच्या खेळपट्टीवर सरावाला येत. त्यामुळं आचरेकर सरांच्या स्मारकासाठी पाच क्रमांकाच्या प्रवेशद्वाराची जागा निवडण्यात आली आहे. विशेष म्हणजे आचरेकर सरांचा पुतळा उभारण्याऐवजी त्यांची ओळख असलेलं क्रिकेट साहित्य आणि त्यांची रोमियो हॅट यांचं एकत्रित शिल्प घडवण्यात आलं आहे. हे स्मारक उभारण्याची संकल्पना राज ठाकरे यांची आहे.