Zero Hour Sambhaji Nagar - Dharashiv : नामांतर विरोधी याचिका फेटळली, महायुतीला किती फायदा होणार?
abp majha web team
Updated at:
08 May 2024 11:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई: "शेक्सपिअरनं म्हटलंय नावात काय ठेवलंय?", याच उक्तीचा सुनावणी दरम्यान वारंवार प्रत्यय आला. असं अधोरेखित करत मुंबई उच्च न्यायालयानं औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला विरोध करणा-या याचिका फेटाळून लावल्यात. राज्य सरकारनं नामांतराचा निर्णय घेताना आणि ही प्रक्रिया पूर्ण करताना कायदेशीररित्या सर्व बाबींची पूर्तता केलेली आहे. त्यामुळे या नामांतरानं कुणाचंही नुकसान होईल असं आम्हाला वाटत नाही, असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला मोठा दिलासा दिलाय.