
Somnath Suryawanshi Mother|मला न्याय मिळाला नाही मी इथेच जीव देते, सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा आक्रोश
Somnath Suryawanshi Mother|मला न्याय मिळाला नाही मी इथेच जीव देते, सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा आक्रोश
परभणीत झालेल्या संविधानाच्या विटंबनेनंतर पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण मिळाले आणि या घटनेनंतर पोलिसांनी धरपकडं करून अनेकांना अटक केली होती. आंदोलकांना अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) यांचा मृत्यू झाला होता. आज दीड महिना उलटला तरीही सोमनाथच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला नाही, यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाच्या नंतर जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने (Somnath Suryawanshi Mother) जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे (Raghunath Gawade) यांच्यासमोर आक्रोश व्यक्त केलाय. तुम्ही मला न्याय दिला नाही मी इथेच आत्महत्या करून माझा जीव देणार असल्याचा इशारा सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) यांच्या आई विजयाबाई यांनी दिलाय. माझा जीव गेला तरी बेहतर पण मी न्याय घेणारच, असा पवित्रा विजयाबाई यांनी घेतलाय