Amravati : मेळघाटात रेबीज झालेल्या लांडग्याची दहशत, पिसाळलेल्या लांडग्याकडून अनेकांचा चावा
प्रणय निर्बाण, एबीपी माझा Updated at: 24 Nov 2021 12:01 AM (IST)
अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटातील धारणी तालुक्यात सध्या रेबिज झालेल्या लांडग्यांची दहशत पाहायला मिळतेय. या लांडग्याने आत्तापर्यंत २५ ते ३० पेक्षा जास्त नागरिकांना चावा घेतलाय.. एका मृत लांडग्याचा अहवाल बंगळुरू येथील प्रयोगशाळेतून वनविभागाला प्राप्त झालाय.. यात रेबिजमुळे लांडगा चवताळल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.