Bhagwangad Land | भगवानगड ट्रस्टला 4 हेक्टर वन जमीन, CM Fadnavis यांची घोषणा

Continues below advertisement
मुख्यमंत्री फडणवीसांनी X पोस्ट करत माहिती दिली की, भगवानगड ट्रस्टला वन विभागाची चार हेक्टर जागा देण्यात येणार आहे. ही जागा भक्तांच्या सुविधांसाठी भगवानगडाजवळ रुग्णालय, प्रशिक्षण केंद्र आणि सामाजिक विकासाकरता वापरली जाईल. महंत नामदेव शास्त्री महाराज आणि संस्थानाने मुख्यमंत्र्यांकडे वनविभागाच्या जमिनीची मागणी केली होती. या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला अखेर यश आल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. या निर्णयामुळे भगवानगडाच्या विकासाला गती मिळेल आणि भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. मंत्री पंकजा मुंडे यांनी भगवानगड ट्रस्टला जमीन देण्याच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार मानले. हा निर्णय भगवानगडाच्या आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यासाठी महत्त्वाचा ठरेल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola