RSS Centenary Celebrations | नागपूरच्या Reshimbag मध्ये 21 हजार स्वयंसेवकांचे प्रात्यक्षिक, जय्यत तयारी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमी उत्सवासाठी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे. अनेक दिवसांपासून तरुण स्वयंसेवकांचे समूह मैदानावरील तयारीच्या कामांमध्ये गुंतले आहेत. संघाचे हे शताब्दी वर्ष असल्याने विविध क्षेत्रांतील मान्यवरांना या उत्सवासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. रेशीमबाग मैदानावर तब्बल एकवीस हजार गणवेशधारी स्वयंसेवक सरसंघचालकांसमोर विविध प्रात्यक्षिकं सादर करणार आहेत. या मोठ्या संख्येतील स्वयंसेवकांचे प्रात्यक्षिक हे विजयादशमी उत्सवाचे मुख्य आकर्षण असेल. संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने हा उत्सव विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. नागपूरमधील रेशीमबाग मैदान या ऐतिहासिक आणि भव्य उत्सवाचे साक्षीदार होणार आहे, जिथे स्वयंसेवकांचा उत्साह आणि शिस्तबद्धता दिसून येईल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola