Electricity : वीजबिल भरण्यासाठी पैसे आणायचे कुठून? वीजबिल न भरल्यास सरसकट कनेक्शन तोडणी
abp majha web team
Updated at:
18 Nov 2021 11:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : एकीकडे शेतमालाला हमी भाव मिळत नाही, तर दुसरीकडे अतिवृष्टीने हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जात आहे. अशात आता सरकार पण शेतकऱ्यांची परीक्षा घेतंय का?, असा सवाल विचारला जातोय. कारण एकीकडे राज्य शासनानं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई म्हणून काही रक्कम देऊ केली. आणि आता महावितरणकडून शेतकऱ्यांनी वीज बिल भरले नाही म्हणून सरसकट डीपी डिस्कनेक्ट केले जातायत. त्यामुळे पिकांना पाणी कसं द्यायचं, असा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा राहीलाय. त्यातच 3 एचपी मोटरसाठी 10 हजार तर 5 एचपी मोटरसाठी 15 हजार भरण्याचीही महावितरणकडून सक्ती केली जात असल्याचं बळीराजा सांगतोय.