BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आग
BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आग
राजधानी मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनमध्ये भीषण आग (Fire) लागल्याची माहिती असून आगीची वृत्त समजताच प्रशासनाकडून सर्व मेट्रो ऑपरेशन थांबवण्यात आले आहेत. त्यानंतर, मेट्रो (Metro) स्टेशनमधील सर्वच प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून प्रशासनाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बीकेसी मेट्रो स्टेशन हे अंडरग्राउंड स्टेशन असून पहिल्यांदाच या ठिकाणी आग लागल्याची घटना घडल्याने सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. मात्र, वेळीच सावधगिरी बाळगल्याने मोठा अनर्थ टळला.
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मेट्रो स्टेशनचे काम सुरु असलेल्या परिसरात आज दुपारी 1 वाजून 9 मिनिटांच्या सुमारास आग लागली. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे कार्य सुरू आहे. सुमारे 40 ते 50 फूट खोल तळघरातील लाकडी साठा आणि फर्निचर असलेल्या ठिकाणी ही आग पसरली होती. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या आणि स्थानिक पोलिसांची टीम कार्यरत असून सर्वच प्रवाशांना अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनमधून बाहेर काढण्यात आलं आहे. दरम्यान, या आगीच्या घटनेमुळे स्टेशनबाहेर मोठी वाहतूक कोंडी झाली असून अग्निशमन दलाच्या 10 ते 12 घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे.