Maharashtra Covid Vaccination : ज्याच्याकडे पैसा त्यालाच लस? लसीकरणापासून गोरगरिब वंचित राहतायत?
मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
29 May 2021 09:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या राज्यात सरकारी लसिकरण केंद्रांवर तरुणांचं लसिकरण लसपुरवठ्याअभावी बंद आहे. मात्र, खाजगी हॉस्पिटल्स आणि खाजगी लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून मुंबईतील रहिवासी सोसायट्या, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये वॉक इन वॅक्सिनेशन ड्राईव्ह सुरु झालेत. विशेष म्हणजे यात १८ ते ४४ वयोगटाला मोठ्या संख्येनं लसिकपण केलं जातंय. त्यामुळे, एकीकडे सरकारी केंद्रांवर तरुणांना देण्यासाठी पुरेशी लस नाही, तर खाजगी केंद्रांवर लस कशी असा सवालही भाजपनं केलाय.